मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग ‘क्वीन्सबेरी प्रमोशन्स’शी असलेला करार मोडणार
नवी दिल्ली, दि. 12 - भारतीय मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग याने फ्रँक वॉरन यांच्या ‘क्वीन्सबेरी प्रमोशन्स’ या प्रसिद्धी आणि जनसंपर्क कंपनीशी असलेला करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून ‘क्वीन्सबेरी प्रमोशन्स’ विजेंदरश झालेल्या करारातील अटी व शर्तींची पूर्तता करत नसल्याचे विजेंदरचे मत आहे. त्यामुळे त्याने हा करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. 2015मध्ये विजेंदर ‘क्वीन्सबेरी प्रमोशन्स’शी करारबद्ध झाला होता. पण त्यांच्या कार्यपद्धतीवर नाखुश असल्यामुळे विजेंदर हा करार रद्द करणार आहे. त्यामुळे आता विजेंदर फक्त ‘आयओएस बॉक्सिंग प्रमोशन्स’शीच करारबद्ध राहणार आहे.
