Breaking News

मुक्त विद्यापीठाच्या सेंद्रिय आंब्यांची गोडी नाशिककरांना चाखायला मिळणार !

नाशिक, दि. 26 - येथील यशवंतराव चव्हाण महारमुक्त विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील आंबा बाग फुलली आहे. याठिकाणी रासायनिक खतांना फाटा  देऊन पूर्णत: सेंद्रिय पद्धतीने वाढविलेल्या आंबा फळांची निर्मितीकरण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाच्या ह्या आंब्यांची गोडी आता नाशिकरांनाही चाखायला मिळणार  असून ते विक्रीस उपलब्ध आहेत.
मुक्त विद्यापीठाच्या सुमारे 150 एकर प्रक्षेत्रापैकी कृषी विज्ञान केंद्राने 100 एकर क्षेत्रावर अत्याधुनिक पद्धतीने विविध फळबागांची लागवड करण्यात आलेली आहे.  त्यात आंबा, चिकू, फणस, द्राक्षे, नारळ, आवळा, सीताफळ, लीची यासारख्या फळ झाडांची लागवड केली आहे. पैकी साधारण 15 एकर क्षेत्रावर आंब्याच्या केसर,  रत्ना, सिंधू, हापूस, बंगणपल्ली, आम्रपाली, दुधपेढा अशा विविध वाणांचे उत्पादन घेतले जाते.
शेतकर्‍यांना प्रत्यक्ष क्षेत्रावर अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्यक्ष अभ्यासता यावे व त्या तंत्रज्ञानाचा स्वतःच्या शेतावर करता यावा या दृष्टिकोनातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर ही  लागवड करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या आवारात सध्या आंब्यांची (कच्ची कैरी) विक्री सुरु करण्यात आलेली असून नाशिककरांना अत्यंत माफक दरात  उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही विक्री सुटीचे दिवस वगळून सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत उपलब्ध राहील. आरोग्यास अत्यंत लाभदायी असल्याने  विद्यापीठाच्या सेंद्रिय आंब्यांना मोठी मागणी येऊ लागली असल्याने जास्तीत जास्त नाशिककरांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले  आहे.