Breaking News

रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली ट्रम्प यांची भेट

वॉशिंग्टन, दि. 12 - रशियाचे परराष्ट्र मंत्री सरगेई लावरोव यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान सीरिया प्रश्‍नावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरगेई लावरोव यांनी रेक्स टिलरसन यांचीही भेट घेत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली.
सिरियाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी रशियाने अमेरिकेसह एकत्रित यावे. तसेच रशियाद्वारे सीरियामध्ये बशर अस असद यांची सत्ता, इराण आणि त्यांच्या प्रतिनिधींवर निर्बंध लादण्याची आवश्यकता असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे संचालक जेम्स कॉर्मी यांची पदावरुन हकालपट्टी केली. याचदरम्यान रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची ट्रम्प यांनी भेट घेतली आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारा दरम्यान रशियाच्या हस्तक्षेपाची चौकशी जेम्स कॉर्मी करत होते.