Breaking News

जागतिक स्किझोफ्रेनिया दिना निम्मित टोल फ्री लाईनचे लोकार्पण

अहमदनगर, दि. 26 - येथील झालानी हॉस्पिटल व मानसोपचार केंद्रामध्ये जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाचे औचित्य साधून  आज टोल फ्री लाईनचे लोकार्पण प्रसिद्ध हृदयरोग तन्य डॉ दीपक यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी डॉ कैलास झालानी ,गणेश निपुंगे ,श्री पिपाडा यांच्यासह मनोरुग्ण व त्याची काळजी घेणारे नातेवाईक उपस्थित होते.  
डॉ दीपक म्हणाले मानसिक आजाराबाबत समाजात मोठे गैरसमज व अन्यान आहे त्यामुळे रुग्णाच्या योग्य उपचारात अडसर येतात 180030027035 हा इपका कंपनीने उपलब्द करून दिलेला क्रमांक लोंकाना माहितीसाठी उपयोगी ठरणार आहे , त्यामुळे  सर्व माहिती उपलब्द होणार आहे यामध्ये आपणास  स्किझोफ्रेनिया , डिप्रेशन , चिंता , विसरभोळेपणा ,झोप न लागणे ,फिट ,व्यसन ,अति चंचलता ,या विषयी मराठीसह नऊ भाषेत माहिती मिळणार आहे
डॉ  कैलास झालानी यावेळी म्हणाले शंभरात एका व्यक्तीला स्किझोफ्रेनिया  या रोगाची लागण होते ,व आज मितीला भारतात एक कोटी पेक्षा जास्त रुग्ण या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत य रुग्णावर उपचार होण्याची व त्यांना आधाराची व समजून घेण्याची गरज आहे यासाठी जगभरात आज हा जागतिक स्किझोफ्रेनिया दिन साजरा केला जातो नियमित व योग्य उपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो . रुग्ण व नातेवाईकांनी अंधश्रद्धा व न्यून गंडा पासून परारुत्त होऊन योग्य ते मानसिक उपचार करून घेणे आवशक आहे असे प्रतिपादन डॉ  कैलास झालानी यांनी यावेळी केले.