धरणांमधील जास्तीत जास्त गाळ काढून न्या!
बुलडाणा, दि. 22 - जमिनीची सुपिकता वाढविण्यासह आपल्या परिसरातील धरणांमध्ये जलसाठा वाढावा यासाठी परिसरातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी गाळ काढून न्यावा, असे आवाहन जि.प.सदस्या अॅड.जयश्रीताई शेळके यांनी केले आहे.
साखळी बुद्रूक सर्कलमध्ये जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध कामे सुरु आहेत. दरम्यान दहिद बुद्रूक येथे धरणातील गाळ काढण्याच्या सुरु असलेल्या कामाची जि.प.सदस्या अॅड.जयश्रीताई शेळके यांनी नुकतीच पाहणी केली. धरणातील गाळ काढल्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. शिवाय सदर गाळ शेतात टाकल्याने शेताची सुपिकताही वाढणार आहे. धरणातील पाण्याचा पुढील हंगामात परिसरातील शेतकर्यांना लाभ घेता येईल, त्यामुळे शेतकर्यांनी जास्तीत जास्त गाळ काढुन न्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत पं.स.सदस्य अमोल तायडे, नंदू राजपूत, नामदेवराव भुसारी, दशरथ भुसारी, मोहन पवार, विजय तायडे, हरिभाऊ तायडे, विलास इंगळे, नितीन तायडे, रुपेश तायडे, महादेव भुसारी यांच्यासह परिसरातील शेतकर्यांची उपस्थिती होती.