ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ बांगलादेशला सुरक्षा पथक पाठवणार
मेलबर्न, दि. 12 - बांगलादेशमध्ये होणारी आगामी क्रिकेट मालिका लक्षात घेता ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ एक सुरक्षा पथक बांगलादेशमध्ये पाठवणार आहे. पुढील आठवड्यात हे पथक बांगलादेशमध्ये दाखल होणार असून तेथील सुरक्षेची पाहणी करणार आहे. ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेश दौ-यावर येणार आहे. उभय देशांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये दहशतवादी हल्ले झाले होते. त्यामुळे हे पथक पाठवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे सुरक्षा पथक बांगलादेशमध्ये येऊन पाहणी करणार आहे. त्या पाहणीचा अहवाल ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाकडे सोपवण्यात येईल. त्यानंतरच ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ या मालिकेबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांनी सांगितले.