Breaking News

विकास साखर कारखान्याच्या कामगारांना 15 टक्के पगारवाढ

लातूर, दि. 12 - वैशालीनगर निवळी येथील विकास सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्मयांना 15 टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. या वेतनवाढीतील अंतरीम वाढ यापुर्वीच दिली असून उर्वरीत वेतनवाढ 01 नोव्हेंबर 2017 पासून लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साखर कामगारांना लागू केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या शिफारशी प्रमाणे ही वेतन वाढ लागू करण्यात आली आहे. यानुसार साखर कारखान्यातील कायम व कायम हंगामी कर्मचार्यांना ही वेतन वाढ लागू होणार आहे. यामुळे साखर कारखान्यातील कर्मचामर्यांना सरासरी रू. 2100 ते रू. 2600 एवढी वेतन वाढ होणार आहे. सध्याच्या अडचणीच्या काळात सुद्धा कर्मचार्मयांना कोणतीही कपात न करता 100 टक्के वेतन दिले जात आहे. 
विकास कारखान्याचे आजवर 16 हंगाम यशस्वीपणे पार पडले आहेत. कारखान्याने सर्वच हंगामात सभासद ऊस उत्पादक शेतकमयांना सर्वोत्तम दर दिला आहे. कारखान्याचे मार्गदर्शक आ. दिलीपराव देशमुख, संस्थापक चेअरमन अमित देशमुख व चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या सुचनेवरून विकास सहकारी साखर कारखाना कर्मचार्मयांना ही वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कामातील गुणवत्तेत वाढ व अधिक कार्यक्षमतेने काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने वेतनवाढ दिली याबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक आ. दिलीपराव देशमुख, संस्थापक चेअरमन अमित देशमुख, चेअरमन वैशालीताई देशमुख, व्हा. चेअरमन गोविंद बोराडे व युनिट 01 चे कार्यकारी संचालक समीर सलगर, युनिट 02 चे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांचे साखर कामगार संघटनेने आभार मानले आहेत.