Breaking News

अवैध रेती वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करा

बुलडाणा, दि. 29 -तालुक्यात सर्वत्र अवैध व नियमबाह्यरित्या रेती वाहतूक करणार्‍या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. या वाहनांमुळे अनेक अपघात झाले असून त्यांत अनेक निष्पाप बळी गेले आहे. परंतु अद्यापही या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांकडून कोणतीही कार्यवाही न करता याकडे जाणिवपूर्वक दूर्लक्ष करण्यात येत आहे. या वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जयभगवान महासंघाच्यावतीने तहसीलदार यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे दिला आहे. 
अवैद्य रेती वाहतूक करणारे वाहने मर्यादेपेक्षा जास्त रेतीची नियमबाह्यरित्यावाहतूक करीत आहे. तर अनेकांकडे वाहतूकीचा परवानाही नाही. या वाहनांमुळे तालुक्यात अनेक ठिकाणी अपघात झाले असून त्यात अनेकांचे बळी गेले आहे. असे असतानाही उपप्रादेशिक परीवहन अधिकार्‍यांकडून या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याकडे त्यांचे होणारे जाणिवपूर्वक दूर्लक्षाबाबत जनतेतून संशयास्पद चर्चा सुरू आहे. यावाहनांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा रास्तारोको करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रविणकुमार जायभाये, गणेश डोळे, युवा जिल्हाध्यक्ष संदीप डोळे, जिल्हा सरचिटणीस सचिन दराडे, तालुकाध्यक्ष प्रमोद थोरवे, प्रविण नागरे, आसाराम डोळे, विष्णू डोळे उपस्थित होते.