आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या 250 पाल्यांना घेणार शिक्षणासाठी दत्तक!
बुलडाणा, दि. 29 - महाराष्ट्रात गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये हजारो शेतकर्यांनी दुष्काळ, गारपीट या नैसर्गिक आपत्तींना तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या 250 पाल्यांना शिक्षणासाठी सातारा येथील जनता शिक्षण संस्था दत्तक घेणार आहे. संस्थेच्यावतीने पाल्यांना दहावीनंतरचे पूर्ण शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. सदर संस्थेचे सदस्य सध्या पश्चिम वर्हाडात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या पाल्यांचा शोध घेण्याकरिता आले आहेत.
गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये हजारो शेतकर्यांनी दुष्काळ, गारपीट या नैसर्गिक आपत्तींना तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना राज्य सरकार काही प्रमाणात आर्थिक मदत करते. राज्यातील अनेक सामाजिक संघटना यांनीही आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचे सामाजिक कार्य केले आहे. या सामाजिक कार्यात आ पणही खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून वाईच्या जनता शिक्षण संस्थेने राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबातील पाल्यांची शैक्षणिक हेळसांड होऊ नये, त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून राज्यभरातील सुमारे 250 मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2016-17 पासून या मुलांना मोफत निवासी शिक्षण देण्यासाठी जनता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ याबरोबरच, किसन वीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ, प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे शिक्षण मध्येच थांबू नये, यासाठी त्यांना मोफत निवासी शिक्षण देण्याची संकल्पना संचालक मंडळापुढे मांडली. संचालक मंडळाने तत्काळ मान्यता दिल्याने या सामाजिक कार्याने गती घेतली. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंना पुढील शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. बारावीनंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतल्यावरही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च जनता शिक्षण संस्था करणार आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या पाल्यांनी संपर्क करण्याचे आवाहन डॉ.डी.बी.आगरेकर यांनी केले आहे.