Breaking News

सुरेंद्र बन्सल यांच्या घरावर पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे

नवी दिल्ली, दि. 24 - दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरेंद्र बन्सल यांच्या घरावर पुन्हा  छापा टाकला आहे. सुरेंद्र कुमार बन्सल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे साडू आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बन्सल यांच्या घरातून  घोटाळ्यासंबंधित आणखी काही कागदपत्रे मिळविण्यासाठी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. बन्सल यांचे दि. 7 मे रोजी हृदयविकाराने निधन झाले आहे.  बन्सल यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन जणांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळ्याप्रकरणी बन्सल यांच्यावर गुन्हे नोंदविले आहेत. यामध्ये रेणु कंस्ट्रक्शनचा देखील समावेश करण्यात आला आहे. ही कंपनी  बन्सल यांची असून प्राथमिक माहिती अहवालात सुरेंद्र बन्सल यांच्या नावाचा समावेश नाही ही आश्‍चर्याची बाब आहे.