शिवसेनेच्या कर्जमुक्ती लढ्यात सामील व्हा!
बुलडाणा, दि. 26 - पेरलं तर पिकत नाही आणि पिकलं तर विकत नाही असा मारा सहन करत मायबाप शेतकरी भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणानेसुध्दा अडचणीत सापडला आहे. आत्महत्यांचे दृष्ट चक्र थांबायला तयार नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘मी कर्जमुक्त होणारच! गर्जतो शेतकरी’चा नारा देत कृषी अधिवेशन देखील घेतले. त्यामुळे जिल्ह्यातून देखील मुख्यमंत्र्याच्या नावे ‘मी कर्जमुक्त होणारच’चे अर्ज भरण्याच्या अभियानाला शिवसेनेच्यावतीने सुरुवात झाली आहे. या कर्जमुक्तीच्या लढ्यात शेतकरी, कष्टकरी बांधवानी सहाागी होवुन शिवसेना पदाधिकार्यांकडे अर्ज भरुन द्यावेत व हा लढा बुलंद करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
बुलडाणा येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाजयांची बैठक आज 25 मे रोजी खा.प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आ.डॉ. संजय रायमुलकर, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘मी कर्जमुक्त होणारच’या शिवसेनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या कर्जमुक्तीच्या लढ्यासंदर्भात खा.जाधव यांनी आढावा घेवुन मार्गदर्शन केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ‘मी कर्जमुक्त होणारच’ हा अर्ज शेतकर्यांकडून भरण्यात येईल. लाखोच्या संख्येत हे अर्ज भरुन घेण्यासाठी शिवसेना पदाधिकार्यांनी कामाला लागावे अशा सुचनाही खा. जाधव यांनी केल्या. कर्ज फेडायला शेतमालाला भाव नाही. शेतकर्यांनी देखील ‘मी कर्जमुक्त होणारच’या अभियानात अर्ज भरुन शिवसेना पदाधिकार्यांकडे द्यावेत, असे आवाहन देखील खा. प्रतापराव जाधव यांनी केले. याबैठकीला संजय गायकवाड, उपजिल्हाप्रमुख शांताराम दाणे, राजेंद्र गायकवाड, बाबुराव मोरे, वसंतराव भोजने, संतोष लिपते, तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, बळीराम मापारी, संतोष डिवरे, कपिल खेडेकर, विजय साठे, रविंद्र झाडोकार, प्रा.डॉ.अनिल अंमलकार, दादाराव खार्डे, दिलीप वाघ, बाळु नारखेडे यांच्यासह शिवसेना पदाधिकार्यांची उपस्थिती होती.