प्रशिक्षकपदासाठी वीरेंद्र सेहवागला बीसीसीआयकडून विचारणा?
नवी दिल्ली, दि. 29 - माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरण्यास सांगण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान मंडळाकडून सेहवागला यासाठी विचारणा झाल्याचे समजते. आयपीएलमध्ये पंजाब संघाचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेल्या सेहवागशी आम्ही आयपीएलदरम्यान संपर्क साधला आणि त्याला संघ प्रशिक्षकपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सांगितले. केवळ सेहवागच नाही, तर इतरही माजी क्रिकेटपटू या पदासाठी अर्ज भरतील, अशी अपेक्षा आहे, असे मंडळाच्या अधिका-याने सांगितले.
दरम्यान, सेहवागला या संदर्भात विचारल्यावर सेहवागने या वृत्ताचा इन्कार केला आहे. मला कोणीही भेटले नाही आणि प्रशिक्षकपदासंदर्भात माझे कोणाशीही काहीही बोलणे झालेले नाही, असे स्पष्टीकरण सेहवागने दिले.
दरम्यान, सेहवागला या संदर्भात विचारल्यावर सेहवागने या वृत्ताचा इन्कार केला आहे. मला कोणीही भेटले नाही आणि प्रशिक्षकपदासंदर्भात माझे कोणाशीही काहीही बोलणे झालेले नाही, असे स्पष्टीकरण सेहवागने दिले.