फ्रेंच ओपन : अव्वल मानांकित कर्बर ला पराभवाचा धक्का
पॅरिस, दि. 29 - फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज अव्वल मानांकित अँजेलिक कर्बर हिला महिला एकेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. बिगरमानांकित एकटेरिना माकरोव्हा हिने कर्बरला 6-2, 6-2 असे पराभूत केले. सामन्य लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. दोन्ही सेटमध्ये कर्बर पूर्णपणे हतबल ठरली. माकरोव्हाने अप्रतिम खेळ करत कर्बरला संपूर्ण सामन्यात डोकेवर काढू दिले नाही. कर्बर यंदाचे विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते. पण या पराभवामुळे तिला सलामीच्या सामन्यातच गाशा गुंडाळावा लागला.