हरमनप्रीत ठरली इंग्लंडच्या टी20 लीगमध्ये खेळणारी पहिली भारतीय
नवी दिल्ली, दि. 29 - भारताच्या महिला टी20 संघाची कर्णधार हरमनप्रीत ही इंग्लंड क्रिकेट मंडळाच्या तर्फे आयोजित किया सुपर लीग या स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. सरे स्टार्स या संघाने तिला करारबद्ध केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ट्विटरच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. किया सुपर लीग ही देशांतर्गत महिला टी20 क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे खेळवली जाते. गेल्या वर्षी या स्पर्धेचा पहिला हंगाम पार पडला. त्यात सहा संघ होते. अंतिम फेरीत ‘वेस्टर्न स्टॉर्म’ला नमवून सदर्न वायपर्सने स्पर्धा जिंकली होती.