मँचेस्टर हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोराचे छायाचित्र प्रसिद्ध
लंडन, दि. 29 - मँचेस्टर येथे अलीकडेच पॉप गायिका अरियाना गांद्रे हिच्या कार्यक्रमात आत्मघातकी हल्ला करणा-या सलमान आब्दी याचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. झालेल्या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या आब्दीच्या पाठिवर एक बॅग असल्याचे आढळून आले आहे. हल्लेखोर हल्ल्य सिटी सेंटर फ्लॅटमध्ये गेला होता. यानंतर तो मँचेस्टर येथे रवाना झाला होता, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये आब्दी गेलेल्या सिटी सेंटरमधील फ्लॅटमध्येच हल्ल्यासाठी शस्त्रास्त्रे तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.