Breaking News

अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये गोळीबार; 8 ठार

मिसिसिपी, दि. 29 - अमेरिकेतील मिसिसिपी येथे एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 8 जण ठार झाले आहेत. मृत व्यक्तींमध्ये एका पोलीस  अधिका-याचाही समावेश आहे. याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील लिंकन  काऊंटी परिसरातील तीन घरांमध्ये गोळीबार झाला, असे तपास यंत्रणेचे प्रवक्ते वॉरेन स्ट्रेन यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अटक केलेल्या संशयिताविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हा हल्ला का करण्यात आला याबाबतही काही माहिती मिळालेली नाही.  तसेच हा हल्लेखोर पीडित व्यक्तींना ओळखत होता का याबाबतही काही स्पष्ट नाही, असे त्यांनी नमूद केले.