Breaking News

बिहारमध्ये जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी गोळीबार; लालू यादव यांचा पुतण्या अटकेत

पाटणा, दि. 29 - बिहारमधील गोपालगंज येथे जमिनीवर ताबा मिळवण्याप्रकरणी दोन समूहांद्वारे गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष  लालू प्रसाद यादव यांचा पुतण्या नितेश याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर पोलिसांनी नितेश यांच्याकडे चौकशी सुरू केली. नितेश यांच्याबरोबर दिनेश  साहू यांनाही अटक करण्यात आली आहे.
येथे करण्यात आलेल्या गोळीबारानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा विरोध करण्यासाठी अनेक जणांनी मुख्य मार्ग अडवून धरला होता. त्यानंतर  पोलिसांनी सर्व जणांची समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.