जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणार्या चार अतिरेक्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीर, दि. 27 - जम्मू-काश्मीरच्या रामपूर सेक्टरमधून घुसखोरी करणार्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान, सीमेवर आता सैन्याकडून शोध मोहीमदेखील सुरु करण्यात आली आहे.
आज (शनिवार) सकाळी लष्कराच्या जवानांना रामपूर सेक्टरजवळ काही संशयास्पद हलचाली दिसून आल्या. त्यानंतर तात्काळ सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. काही दहशतवादी सीमेजवळील तारा कापून आत घुसले होते. ज्यानंतर गोळीबारात लष्कराच्या जवानांनी त्यांना कंठस्नान घातलं.
काल (शुक्रवार) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या पेट्रोलिंग करणार्या टीमवर हल्ला केला होता. सुदैवानं यातील सर्व जवान सुखरुप बचावले. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान सर्च ऑपरेशन करत होते त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अखेर आज सकाळी यातील चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं.