Breaking News

अक्षय कुमार सर्वोत्कृष्ट अभिनेता, दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण

नवी दिल्ली, दि. 04 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत दिल्लीत 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अभिनेत्री सोनम कपूर, अक्षय कुमार यांच्यासह अनेक कलाकार आणि दिग्गज मान्यवरांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.  यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा दबदबा पाहायला मिळाला.  कासव या मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची शर्यत जिंकत, अव्वल क्रमांकाचं सुवर्णकमळ पटकावलं.
याशिवाय दशक्रिया हा मराठीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.  राजेश मापुस्करांच्या व्हेंटिलेटर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. यंदाचा सर्वोत्तम अभिनेता म्हणून रुस्तमफेम अक्षय कुमारला मान मिळाला. रुस्तममधील लाजवाब अभिनयाबद्दल अक्षय कुमार सर्वोत्तम अभिनेता ठरला. तर नीरजा सिनेमातील अप्रतिम अभिनयासाठी सोनम कपूरला विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला.