राज ठाकरेंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला महावितरणचा झटका
नाशिक, दि. 04 - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिकमधील ड्रीम प्रोजेक्ट असणार्या बोटॅनिकल गार्डनला महावितरणनं शॉक दिला आहे. कारण, वीजेच्या खेळखंडोब्यामुळे बोटॅनिकल गार्डनमधला बोलक्या झाडांचा लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. वारंवार विजेचा पुरवठा खंडीत होत असल्यानं या शोमधले 25 दिवे खराब झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. रतन टाटांच्या सीएसआर फंडमधून 23 कोटी रुपये उभारुन राज ठाकरेंनी हा प्रोजेक्ट साकारला होता. ज्याला नाशिककरांकडून मोठा प्रतिसादही मिळाला होता.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं या बोटॅनिकल गार्डनचं उद्घाटन केलं होतं. गार्डनच्या अनोख्या स्थापत्य शैलीचे, तिथल्या कृत्रिम प्राणी आणि थ्री डी शोनं नाशिककरांना भुरळ घातली होती. बोटॅनिकल गार्डनच्या अंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली होती. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात यावे आणि निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा या उद्देशाने पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष लागवडीचा संदेश देणारा आगळावेगळा असा लेझर शो इथे आयोजित केला जात होता. पण प्रमुख आकर्षण असणारा हा लेझर शो आता पुढचे काही दिवस तरी बंदच राहणार आहे.