पनवेल महापालिकेत भाजप बहुमताच्या दिशेने
नवी मुंबई, दि. 26 - पनवेल महापालिकेत भाजपने मुसंडी मारत सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. भाजपने पहिल्या दोन तासात एकूण 78 पैकी 34 जागांवर आघाडी मिळवली आहे. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. 78 जागांसाठी 20 प्रभागातून उमेदवार निवडले जाणार आहेत. यामध्ये 18 प्रभागातून प्रत्येक 4 तर 2 प्रभागात 3-3 (6) उमेदवार महापालिकेत जातील.
पनवेलमध्ये एकूण 53 टक्के मतदान झालं असून 418 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल काही वेळात हाती येईल. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्त्वात भाजप स्वबळावर लढत आहे. तर शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी रिंगणात आहे. खरी लढत भाजप आणि महाआघाडीचीच आहे.