योगी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा परिणाम 100 दिवसांनंतर दिसेल - केशव प्रसाद मौर्य
लखनौ, दि. 08 - योगी सरकारने घेतलेल्या निर्परिणाम 100 दिवसांनंतर दिसायला लागतील, असा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केला.
आम्ही जेव्हा आमच्या सरकारचा 100 दिवसांचा अहवाल सादर करू, त्यावेळी आम्ही सत्तेवर आलो असताना राज्यातील परिस्थिती कशी होती आणि 100 दिवसांनंतर आम्ही राज्याला काय दिले, याचा अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रोड रोमियो पथकांची स्थापना करण्यात आल्यानंतर या योजनेत काही त्रूटी राहिल्या आहेत. मात्र यानंतर राज्यातील महिलांना सुरक्षित असल्याचे वाटू लागले आहे. योगी सरकार पुढील 25 वर्षांपर्यंत सत्तेवर असेल, असा दावा करत तेव्हाही या योजनेत काही बदल होणार नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेला वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षणासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधा देण्याकडे आमचा कल अधिक आहे, असे ते म्हणाले.