Breaking News

वस्तू आणि सेवा कर विधेयक एक जुलैपासूनच लागू होणार

नवी दिल्ली, दि. 09 - वस्तू आणिर विधेयक एक जुलैपासून लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज केली. विधेयक लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किंमतीत जास्त वाढ होणार नसून काही सेवांच्या दरात वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वस्तू आणि सेवाकर विधेयकामुळे राज्य आणि केंद्र या स्तरांवर लागणा-या करांऐवजी एक राष्ट्रीय विक्री कर लागू होणार आहे. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर उद्योजकांसाठी व्यवसाय करणे सोयीस्कर ठरेल. आय-आय कोटक गुंतवणूक गोलमेज परिषदेस संबोधित करतांना ते बोलत होते.
माझ्या अध्यक्षतेखाली आणि प्रत्येक राज्याचे प्रतिनिधित्व करणारी वस्तू आणि सेवाकर विधेयक मंडळ येत्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या वस्तूंसाठीच्या करांचे अंतिम दर ठरविणार असून देशात 1 जुलैपासून लागू होईल, असे जेटली यांनी सांगितले. भारतामध्ये असलेल्या अप्रत्यक्ष करांची रचना गुंतागुंतीची आहे. जे लोक वस्तू किंवा सेवा क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. त्यांना वेगवेगळ्या अथऑरिटीसहस काम करावे लागते, असेही ते म्हणाले. वस्तू आणि सेवाकर विधेयक मंडळाची पुढील बैठक 18-19 मे रोजी होणार आहे.