अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन
सांगली, दि. 29 - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292 व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हास्तरिय अहिल्या जयंती महोत्सव समितीच्यावतीने सांगली शहरातील स्टेशन चौकात दि. 31 मे व दि. 1 जून रोजी दोन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुभाष गोयकर व महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रियदर्शनी विक्रमसिंह वाघमोडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
या अहिल्या जयंती महोत्सवानिमित्त बुधवार दि. 31 मे रोजी सकाळी दहा वाजता येथील स्टेशन चौकात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. सांगली महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर व पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह धनगर समाजातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
याचदिवशी सायंकाळी सहा वाजता हिंदी व मराठी गीतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या मध्यंतरी अहिल्या जयंती महोत्सव समितीच्यावतीने प्रथमच देण्यात येणार्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराचे वितरण व धनगर समाजातील माध्यमिक- उच्च माध्यमिक व स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार असा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सांगली महापालिकेचे महापौर हारूण शिकलगार व काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री मदन पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या अहिल्या जयंती महोत्सवाची सांगता गुरूवार दि. 1 जून रोजी भव्य शोभायात्रेने होणार आहे. या शोभायात्रेस कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील, खासदार संजय पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, दिनकर पाटील, नितीन शिंदे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज आदी उपस्थितीत राहणार आहेत.
सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार्या या शोभायात्रेत सांगली जिल्ह्यातील धनगर समाजबांधव व महिला पारंपरिक पेहरावात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गिनीज बुकात नोंद झालेले शिगाव येथील धनगरी ढोल पथक, चिंचवड (जि. कोल्हापूर) येथील जय जिनेंद्र झांज पथक, आष्टा येथील सारंग बँड पथक व बुधगाव (ता. मिरज) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लेझीम पथकासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्य व कर्तृत्वाचा आढावा घेणारा चित्ररथ व हत्ती, घोडे व उंट हे या शोभायात्रेचे खास वैशिष्ट्य असणार आहे, अशी माहितीही सुभाष गोयकर व श्रीमती प्रियदर्शनी वाघमोडे यांनी दिली.