उत्तर प्रदेशमध्ये 14 तरुणांकडून तरुणीचा विनयभंग; पीडिता बेपत्ता
रामपूर, दि. 29 - उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे 14 तरुणांच्या टोळीने मुलीला मारहाण करून तिच्यावर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या टोळीतील तरुणांनी यासंदर्भातील ध्वनीचित्रफीत सोशल मिडीयावर प्रसिद्ध केली आहे. ही घटना 26 मे ची असून त्यातील पीडित मुलगी बेपत्ता आहे. या सर्व प्रकरणामुळे उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या टोळीतील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
रामपूरमधील एका शेतात दोन मुली आणि एक मुलगा बसलेले होते. तेव्हा या तरूणांच्या टोळीने या तिघांना जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तिघांमधील एका मुलीसोबत अश्लिल चाळे केले असून तिच्यावर जबरदस्तीदेखील केली. यात पीडित मुलगी बेशुद्ध पडली. या सर्व प्रकरणाची ध्वनीचित्रफीत बनवून या टोळीने ती सोशल मीडियावर अपलोड केली. या ध्वनीचित्रफितीमुळे याप्रकरणाबाबत पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.