सचिनच्या चित्रपटाचा ‘वीकेंड मास्टरब्लास्ट’; तीन दिवसांत 27.85 कोटींचा गल्ला
मुंबई, दि. 30 - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा चरित्रपट ‘सचिन : अ बिलीयन ड्रीम्स’ या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत सर्व भाषांमध्ये मिळून तब्बल 27.85 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.40 कोटींची कमाई केली होती. एका सलामीवीराच्या चित्रपटाला यापेक्षा जबरदस्त ‘ओपनिंग’ असूच शकली नसती. त्यानंतर शनिवारी कमाईचा ‘रन रेट’ अधिकच वाढला. दुसर्या दिवशी या चित्रपटाने 9.20 कोटींचा गल्ला जमवला. तर ‘पॉवर प्ले’च्या षटकांप्रमाणे असणा-या सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने तब्बल 10.25 कोटींचा गल्ला जमवत विकेंडमध्ये (शुक्रवार, शनिवार, रविवार) ‘मास्टरब्लास्ट’ केला.
हा सिनेमा हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. भारतात एकूण 2400 आणि परदेशात 400 चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी अक्षरश: रांगेत उभे राहून तिकीटे काढली. ‘सचिनचा चरित्रपट अप्रतिम आहे. आम्हाला ज्या प्रकारच्या चित्रपटाची अपेक्षा होती, तसाच दर्जेदार चित्रपट पहायला मिळायला. त्यामुळे हा चित्रपट पाहिलाच पाहिजे’, असे चित्रपटगृहातून बाहेर पडलेल्या चाहत्याने सांगितले. काही लोक समुहाने चित्रपट बघायला आले होते. ‘सचिनचे आम्ही चाहते आहोत. त्यामुळे चित्रपट एकत्र पाहण्याची वेगळीच मजा आम्ही अनुभवली, असे त्या समुहाने सांगितले. ‘धोनीचा चरित्रपट सुंदर होता आणि सचिनचा चरित्रपटही अप्रतिम आहे. दोन्ही चित्रपट पूर्णपणे वेगळे असल्यामुळे ते अधिक आवडले, असे एका प्रेक्षकाने सांगितले. तर ‘संपूर्ण चित्रपटागृहात मैदानासारखे वातावरण होते’, अशी प्रतिक्रीयादेखील ऐकायला मिळाली.