Breaking News

दिल्लीत अमेरिकेच्या विद्यार्थीनीवर बलात्कार

नवी दिल्ली, दि. 28 - शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीमध्ये आलेल्या एका अमेरिकेच्या विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची घटना घटना घडली आहे. शैक्षणिक सहल झाल्यानंतर पिडीत तरुणी पंजाब येथे आपल्या नातेवाईकांकडे गेल 13 मे रोजी पिडीत तरुणी अमेरिकेला परत जाणा-या आपल्या मित्रमैत्रीणींना भेटण्यासाठी दिल्लीत आली होती. यावेळी एका हॉटेलमध्ये तरुणीची ओळख तीन तरुणांसह झाली. या तरुणांनी पीडित तरुणीला 16 मे रोजी पहाडगंज येथील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवले आणि तरुणीला बळजबरीने मद्य पाजले त्यानंतर एका अज्ञात इसमाने तरुणीवर बलात्कार केला.
याप्रकरणी तिन्ही आरोपींनी पोलिसांमध्ये तक्रार न करण्यास सांगितले. मात्र तरुणीने ही हकिकत अमेरिकेतील मित्रपरिवार आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितली. यानंतर वकीलाच्या मदतीने नबी करीम ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करत आरोपी जसवंत याला अटक करण्यात आली आहे.