Breaking News

दिल्लीच्या आरोग्य विभागात 300 कोटींचा घोटाळा - कपिल मिश्रा

नवी दिल्ली, दि. 28 - दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागात सुमारे 300 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा यांनी केला आहे. 
औषधे आणि रुग्णवाहिका खरेदीसह अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात आवश्यक असलेली औषधे गोदामांमध्ये पडून असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे तरुण सीम यांना 100 कोटींची औषधे खरेदी करण्यात सूट देण्यात आली आहे. केजरीवाल, तरुण सीम आणि सत्येंद्र जैन यांनी आरोग्य विभागात नियम आणि कायद्याचा भंग करत 30 शल्यचिकित्सकांच्या नियुक्त्या केल्या. या प्रकरणी नायब राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.