वाळूच्या ट्रॅक्टरखाली दबून युवक जागीच ठार
जालना, दि. 26 - बेदरकार अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरखाली एका युवकाचा बळी गेल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेह हलविण्यास विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. होता.नळणी येथील पुर्णा नदीच्या पात्रातून एक विनाक्रमांकाचे ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक सुरू होती. या वाळूच्या ट्रॅक्टरमध्ये चालकाच्या बाजूला करण दामोधर दाभाडे (15 रा.थिगळखेडा, ता.भोकरदन) हा युवक बसलेला होता. ट्रॅक्टर नळणीहून उंबरखेड्याकडे जात असतांना पिंपळगाव थोटे शिवारातील तलावाजवळ ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे करण दाभाडे ट्रॅक्टरच्या चाकाखाली येवून जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच मृत युवकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. हसनाबाद ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे, फौजदार एकनाथ पडूळ घटनास्थळी पोहचले.
अवैध वाळू वाहतूक हा कोणतेही नियम न पाळता होणारा अनिर्बंध व्यवहार होत चालला असून महसूल अधिकार्यांना न जुमानता मनमानी करत वाळू माफियांची आरेरावी चालू आहे. या पंधरा वर्षीय युवकाचा मृत्यू हा या बेदरकारपणाचा बळी असल्याने नातेवाईकांनी कारवाईची मागणी करत मृतदेह हलविण्यास नकार दिला.