Breaking News

साई इंजिनिअरिंग कॉलेजवर कडक कारवाई करण्याची मागणी

औरंगाबाद, दि. 26 - साई इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉपी प्रकरणात संस्थाचालक व संबंधितांवर कठोर कारवाई न करता केवळ परीक्षा विभागातील कर्मचार्यांच्या  बदल्या करण्यात आल्या. विद्यापीठ प्रशासन संस्थाचालकाला अभय देत असल्याचा आरोप करीत त्वरित कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली  आहे.याबाबत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना मंगळवारी संघटनेने निवेदन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न साई इंजिनिअरिंग  कॉलेजमधील गैरप्रकारातील दोषी संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने आतापर्यंत एकही कारवाई केली नाही. पोलिस प्रशासनानेच  कारवाया केल्या आहेत. हा प्रकार फक्त साई कॉलेजचा नसून कोहिनूर कॉलेज खुलताबाद, पद्मावती बी. एड. कॉलेज वैजापूर येथील गैरप्रकारांबाबतही कारवाई झाली  नाही असे संघटनेने म्हटले आहे. सर्व दोषींवर कडक कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटेने केली आहे.  निवेदनावर अक्षय पाटील, अमोल दांडगे, मयूर सोनवणे यांची स्वाक्षरी आहे.