Breaking News

अवैध गर्भपात करणारी महिला जेरबंद

औरंगाबाद, दि. 26 - दोन हजारांत गर्भपात करणारी महिला डॉक्टर जिन्सी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. ही कारवाई दुपारी जिन्सी भागात झाली. चंद्रकला  रामराव गायकवाड असे संशयित महिला डॉक्टरचे नाव आहे. पोलिस उपायूक्त राहूल श्रीरामे यांनी माहिती दिली की, जिन्सी भागात गर्भपात सूरू असल्याची तक्रार  एका महिलेने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार दिली. या बाबींची
पडताळणी करण्यासाठी उपनिरीक्षक वर्षा काळे यांच्यासह महिला कर्मचार्यांचे पथक बुरखा घालून जिन्सीतील गायकवाड हिच्या रूग्णालयात गेले. गर्भपात करण्याबाबत  त्यांनी डॉक्टरांना विचारणा केली, त्यावर डॉक्टरांनी होकार दर्शविला. गर्भपातासाठी दोन हजार रूपये मागितले. डमी ग्राहक बनून आलेल्या महिला पोलिसांनी पैशांची  पुर्तता केली. त्यानंतर डॉक्टरांनी काल दुपारची वेळ वर्षा काळे यांना दिली.
डॉक्टरने सांगितल्यानुसार, वर्षा काळे व त्यांचे पथक ग्राहक बनून आले. बुरखा घालून त्या रूग्णालयात बसल्या. त्यानंतर अन्य एका महिलेची गर्भपात करण्याची  प्रक्रिया सुरु असताना डॉ. चंद्रकला गायकवाड हिला रंगेहाथ पकडण्यात आले. तिला ताब्यात घेवून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. तसेच रूग्णालय सील करण्यात  आले.