Breaking News

दुचाकी वाहनांच्या विक्रीत भारत चीनपेक्षाही आघाडीवर

नवी दिल्ली, दि. 08 - दुचाकी वाहनांच्या विक्रीत चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वांत मोठा बाजार झाला आहे. गेल्या वर्षी देशात 1 कोटी 77 लाख  दुचाकींची विक्री झाली. दरदिवशी 48 हजार हून अधिक गाड्या विक्री झाल्या. चीनमध्ये गेल्या वर्षी 1 कोटी 68 लाख दुचाकींची विक्री केली. ही आकडेवारी  सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) व चायना असोसिएशन ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांनी प्रसिद्ध केली आहे.
देशातील ग्रामीण भागात उत्पन्न वाढ व पायाभूत सुविधांचा विस्तार होण्याशिवाय महिलांनीही दुचाकी खरेदी केल्याने आकड्यात वाढ झाली. शहरी भागात  रहदारीमुळे गिअर नसलेल्या गाड्यांची मोठी खरेदी झाली. होंडा या आघाडीच्या कंपनीच्या दुचाकी खरेदीत 35 टक्के महिलांचा समावेश आहे. चीनमध्ये चारचाकी  वाहनांच्या विक्रीत झालेली वाढ व मोठमोठ्या शहरांत पेट्रोल वाहनांवर बंदी आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत दुचाकी बाजारात घट होत आहे.
चीनचा बाजार काही वर्षांपूर्वी अडीच कोटींचा उच्चांकी स्तर गाठल्यानंतर त्यात घट होत आहे. चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक दुचाकी वाहनांना मोठी मागणी आहे, असे  ॠसिआम’चे उपसंचालक सुगतो सेन यांनी सांगितले.