Breaking News

टांझानियामध्ये शाळा बस अपघातात 32 विद्यार्थ्यांचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. 08 - उत्तर टांझानियामध्ये शालेय मुलांना घेर्‍या बसला झालेल्या अपघातात 32 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 
आरुशा भागातील एका प्राथमिक शाळेतील हे विद्यार्थी होते. मलेरी नदीजवळ हा अपघात होऊन बस मोठ्या खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात 32  विद्यार्थ्यांसह 2 शिक्षकांचाही मृत्यू झाला, अशी माहिती आरुशा क्षेत्राच्या पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास केला जात असून तांत्रिक गोष्टींमुळे  अपघात झाला की मानवी चुकीमुळे झाला, हे तपासानंतरच कळेल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. टांझानियामध्ये 2014 ते 2016 दरम्यान 11 हजार  जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.