Breaking News

दिल्ली महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, ’आप’ला यश

नवी दिल्ली, दि. 24 - दिल्ली महानगरपालिकेच्या अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.  दिल्ली राज्य निवडूक आयोगाने ही माहिती दिली.
उत्तर दिल्लीच्या सराई पिपल येथून काँग्रेसचे मुकेश गोयल तर पूर्व दिल्लीच्या मौजपूर येथून आम आदमी पक्षाच्या रेश्मा या विजयी झाल्या आहेत. सराई पिपल आणि  मौजपूर येथे अनुक्रमे 21 आणि 14 मे रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. समाजवादी पक्षाच्या सदस्याचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात  आली होती. दरम्यान, दिल्ली महानगरपालिका मुख्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत 184 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत आम  आदमी पक्षाला 47, तर काँग्रेसला 31 जागांवर समाधान मानावे लागले.