Breaking News

2018 पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहोचणार - पंतप्रधान मोदी

दिल्ली, दि. 24 - पुढील वर्षापर्यंत प्रत्येक गावामध्ये वीजपुरवठा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गुजरातमधील गांधीनगर येथे  आयोजित अडेव्हलपमेंट बँकेच्या वार्षिक बैठकीच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते.
2014मध्ये सत्तेत आल्यानंतर आफ्रिकेसह असलेले मैत्रिपूर्ण संबंध आणखी घनिष्ठ झाले आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरणांमध्ये आम्ही  आफ्रिकेसाठी प्रथम प्राधान्य दिले आहे. आफ्रिका आणि भारताचे पूर्वापार संबंध आहेत. हे संबंध दोन्ही देशांमधील सहकार्याच्या भावनेमुळे टिकून असल्याचे पंतप्रधान  मोदी यांनी सांगितले.
आफ्रिकेसह असलेल्या शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील करारावर भारताला विशेष अभिमान असल्याचेही मोदी म्हणाले.
20 वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारात दुपट्टीने वाढ झाली असून हा व्यापार 54 अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे. तसेच भारतात सर्व प्रकारच्या सुक्ष्म आर्थिक  व्यापारांमध्ये प्रगती झाली आहे. भारताने आतापर्यंत खूप विकास केलेला आहेत. देशापुढे अनेक समस्या होत्या, यात शेतक-यांचा विकास, महिला सबलीकरण करणे  हे महत्वाचे उद्दिष्ट होते. पुढील वर्षापर्यंत कोणतेही गाव विजेशिवाय दिसणार नाही. प्रत्येक गावात वीज पोहोचेल. भारत विकासाचे एक इंजिन असेल असेही पंतप्रधान  मोदी म्हणाले.