Breaking News

परदेशात खादीचा प्रसार करण्याचा सरकारचा प्रयत्न

नवी दिल्ली, दि. 01 - भारतातील खादीच्या वापराला प्रोत्साहन देणा-या मोदी सरकारने आता खादीला भारताबाहेरही प्रतिष्ठा व मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न  सुरू केले आहेत. खादी व ग्रामोद्योग आयोगाकडून संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्त कार्यालयाला एक पत्र पाठवून खादीच्या वापराचे आवाहन केले आहे.
खादी कापड वापरण्यास सोयीचे व आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेच. शिवाय यामुळे कोट्यावधी ग्रामीण भारतीय आत्मनिर्भर होतात व त्यांना रोजगाराची संधी  उपलब्ध होतात, असे खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना यांनी संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तकार्यालयाचे प्रमुख फिलिपो ग्रांडी यांना  पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. खादी कापडाचा वापर निर्वासित तंबू, ब्लँकेट, कार्पेट आणि कॅम्पसाठीही वापरु शकतात,असे सक्सेना यांनी या पत्रात म्हटले आहे.  या पत्राला अद्याप उत्तर आले नसून सकारात्मक उत्तर आल्यास त्यांच्या सोयीनुसार खादी उत्पादनांचा दर ठरवला जाईल, असेही ते म्हणाले.