Breaking News

लालू प्रसाद यादवांच्या मुलाला ‘भारत पेट्रोलियम’ची कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली, दि. 01 - बिहारचे आरोग्य मंत्री व राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादवला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’  कंपनीने (बीपीसीएल) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एका पेट्रोल पंपाच्या बेकायदेशीर परवान्यासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील 15  दिवसांत यावर जबाब देण्यास सांगितले आहे.
तेज प्रताप यादव यांच्या विरोधात तक्रार मिळाल्यानंतर बीपीसीएलचे पाटणा क्षेत्रीय व्यवस्थापक मनिष कुमार यांची स्वाक्षरीने ही नोटीस बजावण्यात आली आहे.  पाटणामधील अनीसाबाद बाह्यवळण (बायपास) रस्त्यावर अयोग्य माहितीच्या आधारे पेट्रोल पंपाचा परवाना मिळवण्यात आला असल्याचा आरोप नोटीसमध्ये  करण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्याच्या तारखेला ए.के. इन्फोसिस्टम प्रा. लि. कंपनीचा समभागधारक किंवा संचालक पदावर यादव नव्हते. कंपनीने यादव  यांना जमीन भाडेपट्ट्यावर दिलेली नव्हती, असेही तक्रारदाराने सांगितले. सदर नोटीस भाजपचे नेते सुशील मोदी यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर बजावण्यात  आली आहे.