बिजू जॉर्ज भारतीय महिला संघाचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक
नवी दिल्ली, दि. 31 - भारतीय महिला संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी बिजू जॉर्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही घोषणा केली. जॉर्ज यांनी या आधी युवा संघाचे श्रेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच कुवेत संघाचे मुख्य प्रशिक्षकपदही त्यांनी भुषवले आहे. याशिवाय ‘आयपीएल’मधील कोलकाता संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक कर्मचारी चमूत त्यांचा काही काळ समावेश होता.
महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षक पूर्णिमा राऊ आणि सहाय्यक प्रशिक्षक सुमन शर्मा यांना पदावरून दूर केल्यानंतर केवळ मुख्य प्रशिक्षकपदासाठीच तुषार अरोठे यांची नियुक्ती कण्यात आली होती. पण त्यांना सहाय्यक प्रशिक्षक देण्यात आला नव्हता. आता जवळपास महिन्याभराने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.