गोल्फपटू टायगर वूड्सला फ्लोरिडा येथे अटक
फ्लोरिडा, दि. 31 - 14 वेळा विश्वविजेता ठरलेला गोल्फपटू टायगर वूड्स याला फ्लोरिडा येथे सोमवारी सकाळी अटक करण्यात आली.मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल त्याला अटक झाल्याचे सांगण्यात आले. मात्र मद्यपान केल्यामुळे नव्हे तर डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा शरीरावर विपरित परिणाम झाल्यामुळे त्याला वाहन चालवताना अटक करण्यात आल्याचे वूड्सने स्पष्ट केले.
मी घेतलेल्या औषधांमध्ये मद्याचा समावेश नव्हता. पण मी घेतलेल्या औषधांचा अनपेक्षित परिणाम माझ्यावर झाला, मला या परिणामांची कल्पनाही नव्हती. त्यामुळे मी तसाच नशेत वाहन चालवत होतो. माझ्याकडून घडलेली चूक ही गंभीर स्वरूपाची आहे. मी माझी चूक मान्य करतो, असे त्याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे.