Breaking News

संगमनेर नगरपालिकेच्या सभेत 253 विषयांना मंजूरी

संगमनेर, दि. 21 -  शुक्रवार दिनांक 19 मे रोजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल 253 विषयांना मंजूरी देण्यात आली आहे. 
शास्त्रशुध्द पध्दतीने शहरातील कचरा निर्मुलन करणे, बायोगॅस प्रकल्पातून वीज निर्मीती करणे, भूमीगत गटार योजना, नेहरु उद्यानात माहिती केंद्र उभारणे, नदीकाठावरील जमिनींचा गाळपेरसाठीचा प्रस्ताव करणे, अशोक चौकातील शाळा नंबर एक येते अभ्यासिका, पथदिवे, रस्ते काँक्रीटीकरण-डांबरीकरण, प्रवरा- म्हाळूंगी नदीकाठ व नाला परिसर सुशोभिकरण आदी 253 विषयांना मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी सदस्यांनी प्रभागातील समस्या मांडल्या. त्याचे प्रशासनाने निरसन केले. यावेळी उपनगराध्यक्ष नितीन अभंग, नगरसेवक दिलीप पुंड, सुनंदा दिघे, डॉ. दानिश शेख, विश्‍वास मुर्तडक, गजानन अभंग, हिरालाल पगडाल, शैलेश कलंत्री, कुंदन लहामगे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदी उपस्थित होते.