खोटे सांगून लग्न करून छळ करणार्यांविरोधात गुन्हा दाखल
नांदेड, दि. 26 - पोलीस उप निरीक्षक असल्याचे खोटे सांगून लग्न केल्या नंतर एका विवाहितेचा दोनदा गर्भपात करून तिला पैश्यांसाठी छळ केल्या प्रकरणी तीन पोलीस कर्मचारी आणि एक वकिलासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड पोलीस दलात पोलीस शिपाई असलेल्या एका कर्मचार्याला तो पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्याचा विवाह औरंगाबाद येथील शिक्षिकेच्या मुलीशी सन 2015 मध्ये करून देण्यात आला.या युवतीचे वडील नाहीत. नांदेड पोलीस दलात कार्यरत पोलीस कर्मचारी बळवंतसिंघ उर्फ लक्कीसिंघ सुक्खासिंघ संधू सोबत करून देण्यात आला.त्या नंतर दोनदा त्या विवाहितेचा गर्भपात करून घेण्यात आला.अनेकदा माहेरातून पैसे आणावेत म्हणून तिचा छळ झाला.या संदर्भाने या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा नवरा पोलीस कर्मचारी बळवंतसिंघ उर्फ लक्कीसिंघ सुक्खासिंघ संधू,भाऊजी पोलीस दिलीपसिंघ मल्ली,नातलग पोलीस पपिनदरसिंघ शोभासिंघ संधू आणि वकील बंधू कुलदीपसिंघ शोभासिंघ संधू आणि तीन महिलांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 498,420 आणि 113 नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती या गुन्ह्याचे तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्या नंतर नांदेडच्या न्यायालयात काही जणांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे.पण त्या अर्जात काय आदेश झाला याबद्दल माहिती प्राप्त झाली नाही.
