पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलं!
नवी दिल्ली, दि. 01 - सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल प्रती लीटर 1.23 रुपये, तर डिझेल 89 पैसे प्रती लीटरने महागलं आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होतील.
पेट्रोलचे दर राजधानी दिल्लीत मध्यरात्रीपासून 65.32 रुपयांहून 66.91 रुपयांवर जातील. तर मुंबईत पेट्रोलचे दर 76.55 रुपयांवरुन 78.12 रुपये प्रती लीटर एवढे होतील. यापूर्वी 16 मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत 2.16 रुपये प्रती लीटर, तर डिझेलच्या किंमतीत 2.10 रुपये प्रती लीटरने कपात केली होती. मात्र आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याने वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागली आहे.