शेतकर्यांकडून बाजार समितीला संपात सहभागी होण्याबाबत निवेदन
लासलगाव, दि. 26 - येत्या एक जुन पासून निफाड तालुक्यातरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाणार असून त्यासाठी लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीने या संपामध्ये सहभागी होऊन या संपाची चळवळ देशव्यापी करण्यासाठी सहकार्य करून बाजार समितीचे कामकाज बंद ठेऊन सहकार्य करावे असे निवेदन लासलगाव व परिसरातील टाकळी, कोटमगाव, खळक माळेगाव, खानगाव येथील किसान क्रांतीच्या शेतकर्यांनी लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर याना दिले आहे. शेतमालाला मिळणार्या अत्यल्प भावामुळे उत्पादन खर्च ही निघत नाही परिणामी कर्जबाजारी शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, शेतमालाला हमीभाव मिळावा,शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा,दुधाला प्रतिलीटर पन्नास रु भाव मिळावा,शेतीसाठी अखंड वीजपुरवठा करावा अशा अनेक मागण्यासाठी दि 1 जून पासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात निफाड तालुक्यातील टाकळी, कोटमगाव, खळक माळेगाव, खानगाव आदी गावामधील शेतकरी संपात सहभागी होणार आहे. यासाठी शेतकरी व विविध शेतकरी संघटनांनी राज्यात संप पुकारला आहे. निफाड तालुक्यातील शेतकर्यांनी संपात सहभागी होण्याची तयारी दर्शविली असून कृती समिती तर्फे बैठकही घेतल्या आहेत.
या प्रसंगी निवेदन सादर करताना प स सदस्य शिवापाटील सुरासे, शंकर शिंदे, संतोष बोराडे, संतोष गोराडे, विकास रायते, दत्ता रायते, बबन रायते, संजयईश्वर शिंदे, सतीश गांगुर्डे, राम शिंदे, दत्तात्रय मापारी, विकास जाधव, नवनाथ भिलोरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.