जनतेचा सेवक म्हणूनच प्रभागात कार्यरत
अहमदनगर, दि. 05 - जनतेचा सेवक म्हणूनच प्रभागात कार्यरत आहे. पुर्वी सत्ता नसल्याने प्रभागाचे काही प्रश्न प्रलंबीत राहिले होते. ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे काम चालू आहे. नागरिकांचे प्रश्न उपकार समजून नव्हे तर कर्तव्य समजून सोडविले जात असल्याची भावना नगरसेवक गणेश कवडे यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्र.22 मधील कोर्ट गल्ली परिसर दो बोटी चिरा येथे बंद पाईप गटार कामाचे भुमीपूजन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तात्या मुदगल, संतोष ग्यानप्पा, डॉ.विद्याधर पुंड, धनंजय शेटे, सोमनाथ डोंगरे, चंद्रशेखर गोंगले, काशीनाथ सिलवंत, अरुण शास्त्री, राजू गोंगले, सुजीत गोंगले, संजय ग्यानप्पा, अभिषेक शेटे, निलेश खताडे, परवेज बागवान, रियाज बागवान, शैबाज बागवान, तेजस व्यापारी, शुभम जाधव, निखील बारस्कर, प्रतिक कराळे आदि उपस्थित होते. डॉ.विद्याधर पुंड म्हणाले की, नागरिकांमध्ये मिसळून काम करणारे नगरसेवक प्रभागाला मिळाले आहे.