नेप्तीच्या सरपंचपदी कविता पुंड यांची बिनविरोध निवड
अहमदनगर, दि. 05 - नगर तालुक्यातील नेप्ती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता अंबादास पुंड यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच माळी समाजाच्या महिलेस सरपंच पदाचा बहुमान मिळाला आहे. या निवडीची घोषणा होताच गावातील युवक व ग्रामस्थांनी ढोल ताश्यांच्या गजरात गुलालाची उधळण केली, तर फटाक्यांच्या आतषबाजीने एकच जल्लोष केला.
नेप्ती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी 4 वर्षे मीरा संजय जपकर यांनी काम पाहिले. 1 वर्ष सरपंचपद माळी समाजाच्या महिलेस देण्याच्या बोलणी वरुन, मीरा जपकर यांनी दि.5 एप्रिल रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. यानुसार गुरुवार दि.04 मे रोजी नेप्ती ग्रामपंचायत कार्यालयात निवडणुक प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी कविता पुंड यांचा एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांची आज रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांनी दाखल केलेल्या अर्जात मीरा जपकर सुचक तर बाबासाहेब होळकर अनुमोदक होते. निवडणुक प्रक्रियेचे कामकाज निवडणुक निर्णय अधिकारी एल.एस. रोहोकले, ग्रामविकास अधिकारी श्रीमती उज्वला पवार व तलाठी प्रताप कळसे यांनी पाहिले. यावेळी उपसरपंच वैजंता जपकर, ग्रामपंचायत सदस्य फारुख सय्यद, नंदू जाधव, संजय जपकर, किसन होले, श्रीपती जपकर, वसंत पवार, मच्छिंद्र होळकर, प्रा.एकनाथ होले, बंडूपंत जपकर, अशोक जपकर, मच्छिंद्र जपकर, जावेद सय्यद, पोलिस पाटील अरुण होले, सोन्याबापू कानडे, रावसाहेब पुंड, गोरख फुले, बबन फुले, पांडूरंग लोंढे, हरी पुंड, जालिंदर शिंदे, शिवाजी शिंदे, रामदास फुले, बंडू जपकर, भानुदास होले, दिलीप होळकर, राजाराम जपकर, शिवाजी गाडेकर, रामराव कांडेकर, तुषार भुजबळ, शशीकांत होले, सागर शिंदे, सौरभ भुजबळ, राहुल भुजबळ, नितीन शिंदे, ऋषीकेश शिंदे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम मंदिर येथे विजयी सभा घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.