महावितरण कार्यालयात वीज ग्राहकांनी मांडल्या तक्रारी
अहमदनगर, दि. 05 - नगर जिल्ह्यात महावितरण कार्यालयांच्या उपविभागीय पातळीवर वीज ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी दिनांक 3 मे 2017 रोजी सकाळी 10.30ते दुपारी 1.30 पर्यंत श्रीगोंदा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात ग्राहक तक्रार निवारणासाठी ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता . यात अनेक वीज ग्राहकांनी आपल्या समस्या मांडल्या वीज वितरणाच्या अभियंता यांनी या समस्या सोडवण्याबाबत ग्राहकांना आश्वसन दिली आहेत
श्रीगोंदा उपविभागात येणार्या वीज ग्राहकांच्या तक्रारी चे निवारण करण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन महावितरण कार्यालय आणि अखील भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने करण्यात आले आहे यावेळी वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणसाठी सह्ह्ययक अभियंता डी.के बागुल यांच्या मार्गदर्शना खाली व उपविभागातील सर्व अभियंता यांच्यासह बिलिंग कर्मचारी , वायरमन इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राहक मेळावा घेण्यात आला यावेळी ग्राहकांनी पाच ते सात वर्षांपूर्वी शेती पंपाचे महावितरण आपल्या दारी योजनेतून कोटेशन भरूनही अजून शेती पंपाचे कनेक्शन मिळाले नाही , वारंवार घरगुती वीज कनेक्शनची मागणी करूनही कनेक्शन मिळत नाही , वीज बिले अव्वाच्या सव्वा आली आहेत . वेळेवर वीजबिले वाटली जात नाहीत . अनेक ठिकाणी वीजभार वाढला असताना नवीन डीपी मंजूर होत नाही . अश्या अनेक तक्रारी ग्राहकांनी मांडल्या यावेळी बाळासाहेब बोरुडे , कांतीलाल कोकाटे यांनी वीज कनेक्शन मिळत नसल्याचे सांगितले यावर शहर अभियंता यांनी याबाबत तातडीने वीज कनेक्शन देण्याचे आश्वासन दिले .इतर तक्रारी बाबत ग्राहकांना आश्वासने देण्यात आली यावेळी शहर अभियंता दीपक गांगुर्डे , कार्यालय अभियंता अश्विनी गोरे , काष्टी चे अभियंता एस . एम . बारगळ , आढळगाव चे अभियंता जी ,. व्ही वडके यांनी ग्राहक तक्रारी निवारणाचे काम केले यावेळी ऊर्जा मित्र शिवाजी साळुंके , उपनगराध्यक्ष अर्चना गोरे , शिवसेना युवसेना प्रमुख हरी काळे, मा . नगरसेवक राजू गोरे आदीं उपस्थित होते.