Breaking News

यमुना नदीत प्रक्रिया न केलेले पाणी सोडू नका - योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली, दि. 08 - यमुना नदीत प्रक्रिया न केलेले पाणी सोडू नका, असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले. यमुना नदीला  स्वच्छ करण्यासाठी हाती घेतलेल्या प्रकल्पाचा आढावा घेतल्यानंतर आदित्यनाथ यांनी हे आदेश दिले. 
यमुना नदीतील पाणी कोठे आहे ? असा प्रश्‍न आदित्यनाथ यांनी आग्रा जिल्हाधिकारी गौरव दयाळ यांना विचारला. यमुना नदीतील खराब आणि दूषित पाण्याचे  प्रमाण वाढले आहे. यावर आदित्यनाथ यांनी अधिका-यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच योगी आदित्यनाथ  यांनी आग्रा दौरा केला. यावेळी आदित्यनाथ यांच्यासह आग्राचे खासदार आर.एस. कठेरिया, पर्यटन विभागाचे दिनेश कुमार आणि गौरव दयाळ हेही उपस्थित होते.