उत्तर प्रदेशमध्ये पतीसमोर महिलेवर सामूहिक बलात्कार
झांसी, दि. 08 - उत्तर प्रदेशमधील जालौनमध्ये एका विवाहितेवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कारानंतर आरोपींनी या महिलेकडील सर्व साहित्य नेले असल्याचे सांगण्यात येत आहे. जालौन येथील रहिवाशी असलेले हे दाम्पत्य जयपूरहून आपल्या घरी परतत होते. एका व्यक्तीने त्यांना गाडीत बसण्यास सांगितले. त्यानंतर एका दारुच्या दुकानात या गाडीत आणखी काही जण चढले. त्यानंतर ती गाडी एका निर्जनस्थळी जागी नेण्यात आली. तिथे पीडित महिलेच्या नव-याला बांधून ठेवण्यात आले आणि तिच्यावर सामूहिक बालात्कार करण्यात आला. हे आठही जण फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित महिलेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
