पाडळसरे प्रकल्प, बलुन बंधार्यांसाठी एक हजार कोटींचा निधी : गिरीश महाजन
जळगाव, दि. 26 - गिरणा नदीवरील 7 बलून बंधा-यांना येत्या पंधरवड्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन या कामासाठी केंद्र सरकारने 650 कोटींचा निधी देण्याचे कबुल केले आहे. त्यामुळे लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहीती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे दिली.
गिरणेचे प्रवाही पाणी अडविण्यासाठी मेहुणबारे, बहाळ, पांढरद, भडगाव, परधाडे, कुरंगी आणि कानळदा येथे सात बलुन बंधारे बांधल्यानंतर 90 किलोमीटर अंतरापर्यंत पाणी साचून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल तसेच जळगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा फायदा होणार आहे.दरम्यान, निधी अभावी रखडलेल्या अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पाच्या कामालाही गती देऊन त्यासाठी साडेचारशे कोटींची तरतूद करून पुढच्या दीड वर्षांत या प्रकल्पात 3 टीएमसी पाणी अडविले जाईल अशी ग्वाहीदेखील महाजन यांनी यावेळी दिली. तापी खोरे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती मिळण्यासाठी आज तापी खोरे विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अधिका-यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर मंत्री महाजन यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी यावर्षी 8 हजार 200 कोटींची आर्थिक तरतूद शासनाने केली आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून आणखी 3 हजार रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक शेतक-याला शेतीसाठी सिंचनासाठी पाणी मिळाले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून त्या अनुषंगानेच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून 5 लाख शेतक-यांना सिंचनाचा लाभ मिळणार असल्याचेही महाजन यांनी यावेळी सांगितले. वाघूर धरणातून पाईपलाइनद्वारे जामनेर तालुक्यातील शेतक-यांना सिंचचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून तालुक्यात दोन हजार शेततळ्यांमध्ये मोजमाप करून पाणी टाकण्यात येईल. प्रत्येक लाभार्थी शेतक-यांना ठिबकनेच शेताला पाणी देण्याचे सक्तीचे असून यामुळे सिंचनाचे क्षेत्र दुप्पटीने वाढून निम्मे पाण्याची बचत होईल हा त्यामागचा शासनाचा उद्देश असल्याचेही महाजन यांनी सांगितले.
बोदवड उपसा सिंचन योजना तसेच चाळीसगाव तालुक्यातील वरखेड लोंढे बॅरेजच्या कामालादेखील लवकरच गती दिली जाणार असल्याचे महाजन यावेळी म्हणाले.