अहमदाबादमध्ये 50 लाखांच्या जुन्या नोटांसह दोघे अटकेत
अहमदाबाद, दि. 30 - अहमदाबादमध्ये 50 लाख रुपयांच्या पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटांसह दोघांना अटक करण्यात आले आहे. काही जण जुन्या नोटा बेकायदेशीररित्या बदलणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.
अहमदाबाद शहराच्या सीमेबाहेर सनाथल सर्कलवर दोन जण एका गाडीतून दोन बॉक्स घेऊन उतरले. त्यांची चौकशी केली असताना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे अधिक तपासात पोलिसांना 50 लाखांच्या जुन्या नोटा सापडल्या. या दरम्यान शांतीभाई चूडासमा व हबीब समा अशी दोघांची नावे असून गाडी चालक पळून गेला. हे दोघेही अहमदाबादमधील रहाणारे आहेत. हे पैसे कोठून आणले याचा तपास आता पोलीस करत आहेत.